Join us  

Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 7:00 AM

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील साधी भोळी अरुंधती आणि स्वार्थी पण तितकीच प्रेमळ संजनाची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना भावते.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या मालिकेतील पात्रांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील साधी भोळी अरुंधती आणि स्वार्थी पण तितकीच प्रेमळ संजनाची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना भावते. अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे तर संजनाची भूमिका रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने. अरुंधती आणि संजनाचं ऑनस्क्रीन जरी पटत नसलं तरी ऑफ स्क्रिन या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.  त्यांच्यातली मैत्रीचा एक धम्माल व्हिडीओ नुकताच अभिनेत्री रुपाली भोसले हिने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

रुपाली भोसले हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे. तिने यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरुंधती तिला थालीपीठ भरवताना दिसत आहेत. दोघीही एकमेकींबरोबर टाळ्या देत हसताना देखील दिसत आहेत. तसेच तिने व्हिडीओमधून मालिकेच्या सेटवर कसे वातावरण असते. नाईट शिफ्ट असली की कलाकारांची कशी वाट लागते तरीही ते कशी धमाल करतात याविषयी तिने सांगितले आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर संध्याकाळी नो ब्रेकमध्ये काम सुरू असते. असे असली की कलाकारांचा त्यात वेळ जातो आणि त्यांच्या जेवणाची वेळ निघून जाते. मात्र तेव्हा अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्यामुळे कलाकारांना थोडेसे का होईना खायला मिळते.

रुपालीनं तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, 'संध्याकाळी नो ब्रेक शूट लागलं की खाण्याची वेळ निघून जाते त्या वेळेत आम्ही सीन देत असतो किंवा रिडींग करत असतो. खाण्याची वेळ निघून गेली की असा पर्याय समोर येतो. मग लाईटिंग किंवा कॅमेरा सेट होईपर्यंत खाऊन घ्यायचे. नाहीतर उशिरा पॅक अप होईल असा आवाज येतो. मग खाणे अर्धवट टाकून पुन्हा कामाला लागतो. मधुराणी तुझ्या हाताचं थालीपीठ लई म्हणजे लई भारी होते आणी त्यात तु भरवलेस त्यामुळे ते आणखी टेस्टी झाले. ऑनस्क्रिन कितीही वाद घालते तरी ऑफस्क्रीन हे असं असतं बघा.

चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षावअरुंधती आणि संजनाची ऑफस्क्रिन धम्माल पाहून त्यांच्या चाहत्यांनी 'बहुत याराना लगता है', असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, 'लव्हली मुमेंट, एक घास प्रेमाचा'. एका चाहत्याने तर दोघींचं प्रेम पाहून 'सवत माझी लाडकी' असेही म्हटले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाहरुपाली भोसलेमधुराणी प्रभुलकर