Join us  

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा 'ठसके'दार व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ, एकदा पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:25 PM

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)च्या लेटेस्ट व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने फार कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती या पात्राने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

मधुराणी प्रभुलकर हिने एक डिझायनर नववारी साडीतला व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यात ती ठुमकत येताना दिसत आहे. या व्हिडीओत ती खूपच सुंदर दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ठसका असे लिहिले आहे. मधुराणी प्रभुलकर हिने हा गेटअप स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता. यावेळी मधुराणीने आपल्या गेटअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

मधुराणीच्या या व्हिडीओला नुसतीच पसंती मिळत नसून कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने लिहिले की मधूराणी ( नावातच मधाचा गोडवा व राणी चा रुबाबदार पणा आहे). तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मधुराणी ताई ज्या पद्धतीने हे सर्व कॅरी करताना खूप खूप छान वाटते त्याप्रमाणे आता आईला ही अश्या रुपात पहिला आवडेल आम्हाला...आईने निस्वार्थी भावनेने आपल्या सर्व गोष्टींचा आपल्या कुटुंबासाठी जणू त्यागच केलेला होता पण आता तो त्याग संपला आहे आईने आता फक्त आणि फक्त तिला काय काय आवडते ते ते करावे...समाज किंवा कुटुंबातील सदस्यांचा विचार न करता...आईच्या जीवनाला आता पर्यंत न मिळालेल्या शिखरापर्यंत नेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...आई.. या व्हिडीओवर खूप कमेंट्स पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकर