बी- टाउनमध्ये पाहावे तेव्हा कॅट फाइट्स होताना दिसतात. दीपिका-कॅटरिना, ऐश्वर्या बच्चन व राणी मुखर्जी, सोनाक्षी सिन्हा व कॅटरिना यांच्या कॅटफाइट्स आठवतात का..? आता मराठी चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा नवीन कॅटफाइट होणार असल्याचे दिसत आहे. नुकताच कलरफुल म्हणजे पूजा सावंत हिने एक नवा कोरा फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये तिने ‘तू तेरा देख के ले’ अशी लाइन असलेला मग हाती घेतला आहे. या लाइनवरून तरी ती कोणाला तरी टॉँट मारत असल्याचे भासत आहे. बहुधा कलाकार आपल्या मनातील भडास काढण्यासाठी ट्विटर किंवा इतर पर्यायी माध्यमांचा वापर करताना दिसतात. त्यातलाच हा एक प्रकार असेल हे नक्की. जरी पूजाने हसून हा टाँट मारला असेल, तरी ‘समझनेवाले को इशारा काफी है’ या म्हणीप्रमाणे जिला तिने हा टॉँट मारला असेल, तिला ही गोष्ट कळलीच असेल.
पूजाने टिष्ट्वटरवरून मारला टॉँट
By admin | Updated: February 15, 2016 03:19 IST