ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - छोटया पडद्यावरील काही जोडया प्रचंड लोकप्रिय ठरल्या. प्रेक्षकांचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले. अशाच जोडयांपैकी एक आहे राम कपूर आणि साक्षी तन्वरची जोडी. राम आणि साक्षीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोघेही लवकरच छोटया पडद्यावर पुन्हा एकत्र येणार आहेत.
टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार एकता कपूरची निर्मिती असलेल्या मालिकेत राम आणि साक्षी मुख्य भूमिकेत दिसतील. या मालिकेचे नाव गुलदस्त्यात असून झी टीव्हीवर ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. सध्या या मालिकेच्या १३ भागांवर काम सुरु आहे. ही जोडी शेवटची एकता कपूरच्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेत एकत्र दिसली होती.
'राम-प्रिया'च्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. तीन वर्ष ही मालिका चालली. अनेक पुरस्कार या मालिकेला मिळाले. साक्षी आणि राम कपूरमधल्या बोल्ड सीन्समुळेही मालिकेची भरपूर चर्चा झाली होती. आगामी दंगल सिनेमात साक्षीने आमिर खानच्या पत्नीची भूमिका केली आहे.