Join us  

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर इतकी बदलली दयाबेन, बघा ओळखू येतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 4:01 PM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिशा काही वर्षापासून शोमधून गायब पण अजूनही लोक तिला विसरलेले नाहीत. त्यांची आवडती दयाबेन सध्या काय करतेय, कशी आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे दयाबेन (Dayaben). अर्थात दिशा वकानी  (Disha Vakani) . दिशा  सध्या शोमध्ये नाही. पण अजूनही लोक तिला विसरलेले नाहीत. त्यांची आवडती दयाबेन सध्या काय करतेय, कशी आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तर सध्या दिशा तिच्या मुलीच्या संगोपनात बिझी आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर दिशाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली. काही महिन्यानंतर ती परतेल, अशी आशा सगळ्यांनाच होती. पण ती अद्याप तरी परतलेली नाही. तूर्तास इंटरनेटवर दिशाचा एक फोटो व्हायरल होतोय. तो पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नो मेकअप लुकमध्ये दिशाला ओळखणंही कठीण झालंय.

फोटोत दिशाच्या खांद्यावर एक छोटीसी मुलगी आहे आणि दिशा कॅमे-याला पोझ देतेय. चेह-यावर हसू आहे पण दिशा थकलेली दिसतेय. पाहता क्षणी हीच आपली दयाबेन यावर चाहत्यांचा विश्वास बसेना झालाय.

दयाबेन अर्थात दिशाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी दीड लाख रुपए मिळत होते.  2017 मध्ये ती दर महिन्याला 20 लाख रुपये कमाई करत होती. तिच्याकडे   37 कोटी रूपयांची एकूण संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तिच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारही आहे. मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये वाढत्या आपल्या लोकप्रियतेमुळे दयाबेनला अनेक जाहिराती मिळाल्या आणि अनेक ब्रॅन्डसोबतही तिने काम केलं. दिशा वकानीने ड्रॅमेटिक आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे.  2015 साली तिने मयूर पहाडीसोबत  लग्न केलं. 2017 मध्ये नोव्हेंबरमध्ये तिला  मुलगी झाली. त्यानंतर तिने मालिकेत काम करणं बंद केलं. दिशा वकानीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती  देवदास, मंगल पांडे: द राइजिंग, जोधा अकबर, लव स्टोरी 2050  या सिनेमांमध्ये दिसली आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी