ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - बॉलीवूडमधील स्टार अभिनेता सुशांतसिंग राजपूतने सिल्व्हर स्क्रिनवर बऱ्यापैकी जम बसवला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अस्थिरता कायम आहे. बॉलीवू़डमधून येत असलेल्या बातम्यांनुसार सुशांतसिंग राजपूतचे पुन्हा एकदा ब्रेकअप झाले आहे. सुशांतसिंग राजपूत आणि कृती सेनन यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमप्रकरण सुरू होते. पण त्यांच्यातील नाते आता संपुष्टात आले आहे.
अंकिता लोखंडे हिच्यासोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यानंतर सुशांतसिंग राजपूत यांच्यातील अफेअरची चर्चा होती. हे दोन्ही स्टार्स आगामी राबता या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण गेल्या वर्षी पूर्ण झाले होते. पण त्यांची प्रेमकहाणी मात्र टिकू शकली नाही.
राबता चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सुशांतसिंग राजपूत आणि कृती सेनन यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला होता. मात्र दोघांनीही सार्वजनिकपणे या नात्याचा स्वीकार कधीही केला नव्हता. बॉलिवूड लाइफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार याआधी दोघेही अनेकवेळा एकत्र दिसायचे, एकमेकांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करायचे. पण ब्रेकअप झाल्यापासून दोघेही एकमेकांबरोबर दिसलेले नाहीत.