‘रागिणी एमएमएस -2’मधील ‘कुडी पटोला’ या आयटम साँगमध्ये जलवा दाखविल्यानंतर सनी लिओन आता ‘हेट स्टोरी -2’मधील ‘पिंक लिप्स’ या आयटम साँगवरून पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सुरवीन चावला हिच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत बोल्ड, तसेच सेक्सी आयटम साँग चित्रित करण्यात आले होते. सुरवीनवरील गाण्यानंतर निर्मात्याने दुस:या आयटम साँगसाठी सनीशी संपर्क साधला. सनीने त्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागून घेतला. आपले गाणो सुरवीनपेक्षाही जास्त सेक्सी असायला हवे, अशी अटच तिने घातली. सनीवर सेक्सी आयटम साँग चित्रित करण्यात आले त्यावेळी स्टुडिओत फक्त कोरिओग्राफर आणि कॅमेरानमन यांनाच प्रवेश देण्यात आला. सुरवीनला मागे टाकत सनीने अत्यंत बोल्ड सीन देऊन हे आयटम साँग चित्रित केले. आता सुरवीन बाजी मारते का सनी, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समजेल.
‘हेट स्टोरी -2’मध्ये सनीचा ‘पिंक लिप्स’
By admin | Updated: June 29, 2014 23:48 IST