‘नो एन्ट्री’च्या सिक्वलमध्ये सलमानसोबत डझनभर अभिनेत्री दिसणार आहेत. काहींची निवड झाली असून, काहींची निवड प्रक्रिया सुरू आहे. दिग्दर्शक अनीस बज्मीला सनी लिओनची निवड करायची होती. कारण तिच्यामुळे या चित्रपटाच्या प्रेक्षक संख्येत वाढ झाली असती असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, यात तोटा जास्त व फायदा कमी होता. हे अनीसला कळाले नाही; परंतु सलमानने तो विचार केला. त्याचे काही नियम आहेत. अभिनेत्रीला कीस न करण्याच्या निर्णयावर तो कायम राहिला आहे. सलमानच्या फॅनमध्ये लहान मुले आणि महिला जास्त प्रमाणात आहेत. त्याच्या नावावर ते चित्रपटाचे तिकीट खरेदी करतात. त्यांच्यासाठी तो असे दृश्य करायला अजिबात तयार नाही.
सनीला सलमानचा नकार
By admin | Updated: May 29, 2014 15:11 IST