Join us

तुषारसोबत सनी लियोन

By admin | Updated: July 10, 2014 00:34 IST

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात बेबी डॉल सनी लियोनसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात बेबी डॉल सनी लियोनसोबत रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. मस्ती, कांटे, हे बेबी, शूट आऊट अ‍ॅट वडाला आणि ग्रँड मस्तीसारख्या चित्रपटांचा डायलॉग राईटर मिलाप जवेरी लवकरच मस्तीजादे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत तुषार कपूर आणि वीर दास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी तुषारने लैला या आयटम साँगमध्ये सनीसोबत काम केले होते. मस्तीजादे या चित्रपटाचे शुटिंग आॅगस्ट महिन्यात सुरू होईल.