Join us

सनी लिओनीने कोरोनाच्या महामारीमध्ये सुरु केले शूटिंग, सेटवरचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 19:30 IST

अभिनेत्री सनी लिओनी देखील शूटिंगवर परतली आहे.

लॉकडाऊननंतर हळूहळू मनोरंजन विशेष आपल्या पूर्वपदावर येते आहे. हळूहळू सेलिब्रेटी शूटिंगला सुरुवात करत आहेत. अर्थातच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळी काळजी सेटवर शूटिंग दरम्यान घेतली जात आहे. अभिनेत्री सनी लिओनीदेखील शूटिंगवर परतली आहे. तिचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती शूटिंग करताना दिसतेय.

हा फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सनीच्या ब्रॅकग्राऊंड डान्सर्सबरोबर नाचताना दिसते आहे. खास गोष्ट म्हणजे सनीच्या मागे डान्स करणाऱ्यांनी चेहऱ्यावर मास्क घातला आहे. सोशल डिस्टेंसिंगचे देखील पूर्ण पालन करण्यात आले आहे. फोटो तिने सिल्व्हर कलर टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला आहे.

दिर्घकाळानंतर शूटिंगच्या सेटवर परत आल्याबद्दल सनी लिओन आनंदी दिसत आहे. सोशल मीडियावर सनी खूप अॅक्टिव्ह असते. ती स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी रागिनी एमएमस 2 मध्ये दिसली होती. सनी 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सनी लिओनी