Join us

...अन् सनी लिओनी झाली अदृश्य! व्हिडीओ पाहून हमखास आठवेल ‘मिस्टर इंडिया’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 10:50 IST

हा VIDEO एकदा पाहाच...

ठळक मुद्दे  इंडो-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉर्नस्टार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे सांगणे नकोच. स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या याच अदांमुळे फॅन फॉलोर्इंगच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सुपरस्टार्सलाही टक्कर देते.  भारतात गुगलच्या ‘मोस्ट सर्च्ड सेलिब्रिटी’च्या यादीत सनीचे नाव आघाडीवर आहे, इतकी ती लोकप्रिय आहे. सध्या सनीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा हमखास आठवेल. या व्हिडीओत सनी मिस्टर इंडियाप्रमाणे गायब झालेली दिसत आहे.  फरक इतकाच तिला गायब करणारे कुठलेही घड्याळ नाही तर एक रिंग आहे.

होय, व्हिडीओत सनीच्या हातात एक रिंग आहे. या रिंगचा वापर करून ती गायब होते.  हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना, ‘आता मला गायब होण्यासाठी कोणत्याही घड्याळाची गरज नाही,’ असे तिने लिहिले आहे.  या तिच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडत आहे. आत्तापर्यंत सुमारे 9 लाखांवर लोकांनी तो पाहिला आहे.

अगदी अलीकडे सनीचा एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिच्या पाठीवर भलीमोठी जखम दिसली होती. पण मुळात ती जखम नव्हती तर मेकअपची कमाल होती.

 इंडो-कॅनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पॉर्नस्टार आहे. सनीने ‘जिस्म 2’ चित्रपटातून  बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘बिग बॉसच्या 5’ मध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

टॅग्स :सनी लिओनी