Join us

'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा दिसणार सुनील ग्रोव्हर ?

By admin | Updated: March 27, 2017 21:49 IST

डॉक्टर मशहूर गुलाटीच्या चाहत्यांसाठी खुशखबर, सुनील ग्रोव्हर अजूनही द कपिल शर्मा शो चा एक हिस्सा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27- डॉक्टर मशहूर गुलाटीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.  सुनील ग्रोव्हर अजूनही 'द कपिल शर्मा शो'चा एक हिस्सा आहे असं ट्विट वृत्तसंस्था एएनआयने केलं आहे. 'द कपिल शर्मा शो' मधील सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ट्विट केलं. 
 
सुनील व्यतिरिक्त चंदन प्रभाकर आणि अली असगर हे देखील शोचा एक हिस्सा असून शोच्या पुढच्या भागाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, अजून या तिघांनी चित्रिकरणाला सुरूवात केलेली नाही. ते तिघं केव्हा चित्रिकरणाला सुरूवात करणार याची आम्ही वाट पाहत आहोत असं ' द कपिल शर्मा शो'मधील सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच सुनील आणि कपिलची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसू शकते. राजू श्रीवास्तव, एहसान कुरैशी आणि सुनील पाल यांच्या बरोबर प्रदर्शित झालेला भाग हा विशेष भाग होता, यामध्ये केवळ कॉमेडियन्सना बोलावण्यात आलं होतं, ते शोचा हिस्सा नाहीयेत असंही ट्विट एएनआयने केलं आहे. काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चर्चेत आहे. कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्माने सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केला होता. तेव्हापासून सुनील ग्रोव्हर शो सोडणार असल्याची चर्चा आहे.