प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका पोठापाठ एक दिलेल्या मुलाखतीत तिने पर्सनल आणि प्रोफेशन लाईफमध्ये अनेक खुलासे केले आहेत. सुचित्राने मुलाखतीमध्ये शेखर कपूरवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तिने कास्टिंग काऊचचा आलेला वाईट अनुभवही सांगितला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा आलेला अनुभव सांगितला. तिने सांगितले की, मी निर्माता-दिग्दर्शकाला भेटले होते. त्यावेळी हॉटेल्समध्ये मीटिंग होणं अगदी सामान्य होते.
वडिलांना कॉल करायला सांगितला त्या माणसाने मला पुन्हा विचारले - तू तुझ्या आईच्या किंवा वडिलांच्या सर्वात जास्त कोणाच्या जवळ आहेस? मी उत्तर दिले - मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे. तो म्हणाला खूप छान, मग तुझ्या वडिलांना फोन करून सांग की मी तुला उद्या सकाळी घरी सोडतो.
सुचित्राने पुढे सांगितले की, हे ऐकताच तिला रडू कोसळले. त्याने तिचे सर्व सामान उचलले आणि तिला सांगितले की ती लवकरच परत येते पण तिने तिथून पळ काढला. सुचित्रा म्हणाली- सुरुवातीला मला ते काय बोलत होते ते समजले नाही. मग मी विचार केला की आता फक्त ४-५ वाजले आहेत, उद्या सकाळपर्यंत त्यांच्यासोबत काय करू. त्यानंतर त्याचा हेतू काय आहे, याच्या इशारे द्यायला सुरुवात केली. पण हे खूप व्हायचं.
सुचित्राला 1994 मध्ये आलेल्या 'कभी हां कभी ना' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. चित्रपट निर्माता शेखर कपूरसोबत लग्न केल्यानंतर सुचित्राने चित्रपटात काम करणं बंद केलं.