Join us

स्टाइल म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे प्रेझेंटेशन - संजय जाधव

By admin | Updated: January 15, 2017 03:05 IST

स्टाइल प्रत्येकासाठी स्पेशल असते. मात्र माझ्यासाठी स्टाइल म्हणजे एकप्रकारचे प्रेंझेटेशन आहे. स्टाइलमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून तर येतेच शिवाय एक व्यक्ती म्हणून तुम्ही

स्टाइल प्रत्येकासाठी स्पेशल असते. मात्र माझ्यासाठी स्टाइल म्हणजे एकप्रकारचे प्रेंझेटेशन आहे. स्टाइलमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून तर येतेच शिवाय एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याचे प्रतिबिंब तुमच्या स्टाइलमधून समोर येत असते. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात याचे एक प्रेझेंटेशन म्हणजे तुमची स्टाइल असते असे माझे मत आहे. स्टाइल तुमच्या पर्सनॉलिटीला चारचाँद लावते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. माझ्या चित्रपटसृष्टीत येण्याला किंवा हे करिअर म्हणून करण्याला स्टाइलच कुठे ना कुठे कारणीभूत आहे. कारण या स्टाइलमुळेच मी या चित्रपटसृष्टीत एंट्री मारली आहे. एकदा मी एका व्यक्तीला पाहिले होते. त्या व्यक्तीकडे मी बघतच बसलो. कारण तो एकदम मस्त स्टायलिश कपडे घालून आला होता. कार्गो ट्राऊजर, चेक्सचा शर्ट, डोक्यावर हॅट त्याने परिधान केली होती. कुणी तरी मला सांगितले की तो एक कॅमेरामन आहे. त्याला पाहून मी निश्चय केला, की आपणही कॅमेरामन बनायचे. स्टाइल ठेवायची, तर त्या माणसासारखीच, असे मनाशी पक्के केले. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील माझ्या एंट्रीचे प्रेरणास्थान म्हणजे तो अनाहूत स्टायलिश व्यक्तीच होय. याशिवाय चित्रपटसृष्टीतही अनेक स्टायलिश व्यक्ती आणि कलाकार आहेत. मात्र रोमान्सचा बादशाह किंग शाहरुखची स्टाइल मला सगळ्यात बेस्ट आणि परफेक्ट वाटते. तर मराठीतही अनेक स्टायलिश अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. मला मात्र अंकुश चौधरीची स्टाइल भावते. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे, की स्टाइल में रहेंने का!