जी तुमची असते, स्वत:ची असते ती स्टाइल असते. तुम्ही जे फॉलो करता ती फॅशन असते. स्टाइल हे चांगले कपडे, अॅक्सेसरीज, शूज नसून तुमचा अॅटिट्यूड तुमची स्टाइल असते. मला फारसे कपड्यांमध्ये, अॅक्सेसरीजमधलं कळत नाही. असं म्हणतात जे कुंभ राशीचे असतात त्यांची स्टाइल खूप विचित्र असते आणि माझी रास ही कुंभ आहे. माझी पत्नी मला स्टायलिश बनवण्यासाठी खूप मेहनत घेते. तीच सगळ्या गोष्टींची निवड करत माझ्या स्टाइलमध्ये त्या गोष्टी अॅड करत असते. मला अपडेट आणि अपग्रेटेड ठेवण्याचे काम माझी पत्नी करते. माझ्यासाठी कम्फर्ट महत्त्वाचा आहे. मला फार फ्लॅशी क्लोथ आवडत नाहीत. त्यामुळे नेहमी मी टी-शर्ट, जीन्स आणि हातात एक घड्याळ कॅरी करतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी ज्यांना बघत लहानाचा मोठा झालो ते म्हणजे जॅकीदादा.आमच्या तरुणपणी ९० च्या दशकात जॅकी श्रॉफ यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांची स्टाइल बरेच जण कॉपी करताना दिसायचे. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन हे माझे खूप फेव्हरेट आहेत, कारण त्यांची प्रत्येक गोष्ट स्टाइल बनते, त्यामुळे कधीही अमिताभ बच्चन माझ्यासाठी मोस्ट स्टायलिश पर्सनॅलिटी असतील. नवीन जनरेशनमध्ये सिनेइंडस्ट्री सोडली तर क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीची स्टाइल मला भावते, तर दुसरीकडे मराठी इंडस्ट्रीत उमेश कामतच्या ड्रेसिंग स्टाइलचे मला नेहमी अप्रूप वाटते. त्याची कपड्यांची स्टाइल खूप मस्त असते. तसेच स्वप्निल जोशीचीही हटके स्टाइल असते. त्याचेही मला नेहमी कौतुक वाटते.
स्वत:ची असते ती स्टाइल फॉलो करतो ती फॅशन
By admin | Updated: January 11, 2017 05:36 IST