भारतीयांना खेळ व सिनेमाचे फार वेड आहे. वेळात वेळ काढून आपल्या आवडत्या नटाला पाहणे व खेळासाठी सर्व कामे बाजूला सारणे ही तर अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. परंतु खेळाचे हे आकर्षण फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर फेमस बॉलीवूड स्टार्सही खेळाच्या पे्रमात पडले आहेत. रणबीर कपूरने नुकताच आयएसएलचा मुंबई संघ विकत घेतला आहे. रणबीरशिवायही काही स्टार्सनी तर क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल यासारख्या खेळांत आपले पैसे गुंतवले आहेत. अशाच काही स्टार्सची ही खेळकथा...
रणबीर कपूर : रणबीर फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा प्रचंड चाहता आहे. म्हणूनच त्याने या खेळाला प्रमोट करण्यासाठी आयएसएलचा मुंबई संघ विकत घेतला आहे. रणबीर आपल्या संघाची फार काळजी घेतो.
सलमान खान : सलमानदेखील या यादीत समाविष्ट झाला आहे. सेलीब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तो आपल्या भावाच्या टीमला चीअरअप करताना दिसला होता. आता त्याने फुटबॉलच्या इंडियन सुपर लीगच्या पुणे संघाची फॅ्रन्चायझी घेतली आहे. आपल्या दबंग स्टाईलमध्ये तो फुटबॉल खेळाडूंसाठी चीअरअप करणार आहे.
जॉन अब्राहम : जॉन अब्राहम हा इंडियन हॉकी लीगच्या दिल्ली वॉरिअर या संघाचा मालक आहे. नुकतीच त्याने इंडियन सुपर लीगमध्ये गुवाहाटी या संंघाची मालकी घेतली आहे. हॉकी लीगच्या पूर्वी झालेल्या सर्व वादानंतरही जॉन अब्राहमने दिल्ली वॉरिअरची मालक ी कायम राखली. अभिषेक बच्चन :अभिषेक खेळाचा चाहता आहे. त्याला मुंबई इंडियन्स व चेलसा या संघांना चीअरअप करताना पाहिलेच असेल. आता हा स्टार देशी खेळांना प्रमोट करतोय. प्रो-कबडी लीग यात त्याने पिंक पॅन्थर्स या संघाची मालकी घेतली आहे. पिंक पॅन्थर्सची कामगिरी प्रो-कबडीत चांगली होती.
शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी ही आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स या संघाची मालकीण आहे. सामन्यादरम्यान तिचे अनेक अवतार व लटके झटके प्रेक्षकांनी पाहिले आहेत. तिच्या संघाबाबत अनेक उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरीही ती फारच सक्रिय असते.
प्रीती झिंटा : खिलाडूवृत्ती शिकावी ती प्रीतीकडून. आयपीएलचा किंग्ज एलेव्हन पंजाब संघात प्रीतीची भागीदारी आहे. खेळाडूंना तिने दिलेली ‘जादू की झप्पी’ खूप चर्चेत होती. पण तिच्या जादूच्या झप्पीचा फार फायदा झाला नाही. तिचा संघ एकदाही आयपीएलमध्ये मोठी कामगिरी क रू शकला नाही.
शाहरूख खान -जुही चावला : आपल्या कॉलेज जीवनात क्रिकेट, फुटबॉल व हॉकी खेळणारा शाहरूख खान बॉलीवूडचा किंग खान झाल्यावर क्रिके टकडे वळला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाइट रायडरची फ्रँचायजी विकत घेतली. कोलकाता नाइट रायडर या संघात जुही चावलाची भागीदारी आहे. सामन्यादरम्यान ती अॅक्टिव्ह असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहे. आपला संघ विजयी व्हावा, यासाठी तिने देशभरातील अनेक मंदिरे पालथी घातली होती. अखेर तिच्या नवसाने संघाला विजय मिळाला.