Join us

बाहुबली 2 च्या प्रदर्शनात कटप्पाचा अडथळा

By admin | Updated: March 27, 2017 19:48 IST

एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बाहुबली-2 द कंक्ल्यूजन अडचणीत सापडला आहे. या अडचणीच कारण ठरला आहे तो कटप्पा?

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बाहुबली-2 द कंक्ल्यूजन अडचणीत सापडला आहे. या अडचणीच कारण ठरला आहे तो कटप्पा? कटप्पाचा रोल करणाऱ्या अभिनेते सत्यराज यांच्यामुळे कर्नाटकमध्ये चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला जातोय. भव्यदिव्यतेमुळे चर्चेत आलेला आणि लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेल्या बाहुबली या चित्रपटानंतर आता बाहुबली 2 या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सत्यराज यांनी मध्यंतरी केलेल्या त्या विधनामुळे लोकांनी बाहूबली विरोध दर्शवला आहे. सत्यराज यांनी काही दिवसांपूर्वी तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे बाहुबलीला कर्नाटकात विरोध केला जातोय. कर्नाटकातील काही कन्नडवादी लोकांच्या गटाने अभिनेता सत्यराज यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. कन्नडवादी गटातील काही कार्यकर्त्यांनी कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉर्मसच्या अध्यक्षांची भेट घेत त्यांच्याकडे ह्यबाहुबली २ह्ण या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे.याप्रकरणी अभिनेते सत्यराज यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी अभूतपुर्व प्रतीसाद दिला आहे. अल्पवधीतच ट्रेलरला 10 कोटींपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे