Join us

श्रीदेवींना ‘जीवनगौरव’

By admin | Updated: June 16, 2016 03:44 IST

यंदा ‘आयफा रॉक्स २०१६’ स्पेनमध्ये होणार आहे. येत्या २३ ते २६ जून या काळात होणाऱ्या या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक प्रतिष्ठित असा ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट’ हा अवॉर्ड

यंदा ‘आयफा रॉक्स २०१६’ स्पेनमध्ये होणार आहे. येत्या २३ ते २६ जून या काळात होणाऱ्या या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक प्रतिष्ठित असा ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट’ हा अवॉर्ड यंदा कुणाला मिळणार आहे माहितीय?? दुसरे तिसरे कुणी नाही तर ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना. होय..आयफाच्या या पुरस्काराने गौरविल्या जाणाऱ्या श्रीदेवी या सर्वांत कमी वयाच्या स्टार ठरणार आहेत. सन २०१३ मध्ये श्रीदेवी आयफाच्या स्टेजवर परफॉर्मन्स देताना दिसल्या होत्या. यंदा आयफाच्या स्टेजवर त्या ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट ’ पुरस्कार स्वीकारताना दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक सरस चित्रपट देणाऱ्या, अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर तेवढ्याच जोमाने पुनरागमन करणाऱ्या श्रीदेवींचा हा सन्मान निश्चितपणे बॉलिवूड प्रेमींना सुखावणारा असेल..होय ना??