Join us

हंसिकाच्या शूटसाठी श्रीदेवीने पाहिली वाट

By admin | Updated: February 4, 2015 23:41 IST

इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवीकडे अधिकच संयम असल्याचे दिसून आले आहे.

‘इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवीकडे अधिकच संयम असल्याचे दिसून आले आहे. आगामी तामिळ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपली सहअभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा शॉट व्यवस्थित होईपर्यंत तब्बल चार तास श्रीदेवीने वाट पाहिली आहे. हंसिकाच्या शॉटला दिग्दर्शकाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर श्रीदेवी यांनी आपला शॉट केला.