मुंबई : आपल्या लाडिक अभिनयाने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी ही प्रियकर वरद लघाटेसोबत शुक्रवारी विवाहबंधनात अडकली. दादरच्या शिवाजी पार्क येथील वनिता समाज हॉलमध्ये सकाळी 11.18च्या मुहूर्तावर त्यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला.
या सोहळ्याला मराठी सिनेनाटय़ जगतातील अनेक सेलीब्रिटींनी आवजरून उपस्थिती लावली होती. संध्याकाळी झालेल्या स्वागत समारंभात उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट या स्पृहाच्या गाजलेल्या मालिकांमधील कलाकार उपस्थित होते. उमेश कामत-प्रिया बापट, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, चिन्मय मांडलेकर असे अनेक कलाकार या वेळी उपस्थित होते. लग्नसोहळ्याच्या प्रत्येक विधीला स्पृहाने वैविध्यपूर्ण 8 साडय़ा परिधान केल्या होत्या. स्पृहाचा नवरा वरद सध्या एका नामांकित शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये कार्यरत आहे. त्याने याआधी अनेक वृत्तपत्रंतून लिखाण केले आहे. (प्रतिनिधी)