Join us

वहिदा रहेमान यांना विशेष पुरस्कार!

By admin | Updated: December 31, 2015 01:35 IST

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार

मुंबई : यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते २२ जानेवारी २०१६ रोजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी हा पुरस्कार दिला जाईल, अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.महोत्सवात यंदा शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजनही केले आहे. राज्यातील १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘बदलता महाराष्ट्र’ या विषयावर कमाल पाच मिनिटांचा वेळ असलेली शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी पाठवण्यात येईल. डीव्हीडी स्वरूपात किंवा शॉर्ट फिल्मची लिंक ईमेल करून स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल. ही स्पर्धा नि:शुल्क आहे.