Join us  

Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 3:35 PM

रजनीकांत यांनी एका कार्यक्रमात मनातल्या भावना व्यक्त करताना भीती दर्शवली. नेमकं काय म्हणाले रजनीकांत?

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आजही मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. रजनीकांत यांचे सिनेमे म्हणजे हाऊसफुल्ल हे समीकरण ठरलेलं असतं. रजनीकांत विविध कार्यक्रमांत राजकीय - सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतात. अलीकडेच एका कार्यक्रमात रजनीकांत सहभागी झाले होते. यावेळी समोर मीडियाला पाहताच त्यांनी मनातली भीती व्यक्त केली. काय म्हणाले रजनीकांत बघा.

तामिळनाडूमधील एका हॉस्पिटल उद्धाटनाच्या जाहीर कार्यक्रमात रजनीकांत म्हणाले, "मला याप्रसंगी अजिबात बोलायचे नव्हते, पण मला दोन शब्द बोलायला सांगितले गेले. कार्यक्रमाला अनेक मीडिया हाऊस असतील का, असं मी मगाशी विचारलं. ते म्हणाले फक्त काहीजण असतील. आता समोर हे सगळे कॅमेरे बघून मला भीती वाटते. सध्या निवडणुक तोंडावर आली आहे. मला श्वास घ्यायलाही भीती वाटते.'' असं म्हणताच उपस्थित सर्वजण हसू लागले.

 आपल्या भाषणादरम्यान रजनीकांत पुढे म्हणाले, “पुर्वी कावेरी हॉस्पिटल कुठे आहे असे विचारले असता लोक म्हणायचे की, ते कमल हासनच्या घराजवळ आहे. आता कमलचे घर कुठे आहे, असे विचारले असता ते कावेरी हॉस्पिटलजवळ असल्याचं लोक सांगतात. मीडियावाल्यांना विनंती आहे की, मी ही अत्यंत सामान्य विधानं करत आहे. रजनीकांत यांनी कमल हासनवर टीका केली आहे असं लिहू नका." अशाप्रकारे रजनीकांत यांचा मिश्किल अंदाज बघायला मिळाला.

 

टॅग्स :रजनीकांतनिवडणूकलोकसभा