Join us  

समांथाचा रोमान्स पाहून पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य थिएटरमधून पडला बाहेर?, अभिनेता म्हणाला-याबद्दल मी..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:21 PM

घटस्फोटानंतरही नागा चैतन्यचं समांथावर प्रेम असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता अखेर अभिनेत्याने मौन सोडलं आहे.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असले तरी या दोघांची सोशल मीडियावर वारंवार चर्चा ऐकायला मिळत असते. . त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या नात्याबद्दलही बरेच काही बोलले गेले पण तरी या दोघांनी एकमेकां विरोधात काहीच वक्तव्य केले नाही.  घटस्फोटानंतरही नागा चैतन्यचं समंथावर प्रेम असल्याचं वृत्त नुकतंच व्हायरल झालं होतं. यावर आता अखेर अभिनेत्याने मौन सोडलं आहे.  

समांथा रुथ प्रभू तिचा आगामी रोमँटिक चित्रपट 'कुशी'ला घेऊन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच कुशीचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नागा  नुकतीच एका चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. पण हा सिनेमा अर्धवट सोडून नागा थिएटरमधून बाहेर पडल्याची चर्चा रंगली होती. का तर इंटरवलदरम्यान जेव्हा समांथाच्या आगामी ‘कुशी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. समांथाचे  विजय देवरकोंडासोबत रोमाँटिक सीन्स पाहू न शकल्याने नागा चैतन्यने थिएटरमधून बाहेर पडला, अशी चर्चा सुरु झाली होती. यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

''या चर्चांमध्ये कोणतंच तथ्य नाहीय. या फालूतच्या अफवा काही तेलुगू न्यूज पोर्टल्सनी पसरवल्या आहेत. याबद्दल मी त्यांना आधीच स्पष्टीकरण दिलं आहे.'' असं नागा चैतन्य म्हणालाय. तर  दुसरीकडे समंथाच्या कुशी या चित्रपटाच्या पिआर टीमकडून प्रसिद्धीसाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप नागाच्या टीमकडून केला जात आहे.

समांथाने नुकतेच ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण लग्नाच्या चार वर्षातच नागा आणि समंथा यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले

टॅग्स :समांथा अक्कीनेनी