गेल्या काही दिवसांत एकामागून एक सेलिब्रिटींच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यात आता मल्याळम चित्रपट अभिनेता हरीश पेंगन(Harish Pengan)च्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. हरीश पेंगनचे ३० मे रोजी निधन झाले. तो ४९ वर्षांचा होतो. हरीश पेंगन आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यकृताच्या समस्येशिवाय त्यांना आणखी काही गंभीर समस्या होत्या, ज्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोटदुखीच्या तक्रारीनंतर हरीश पेंगनला मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर हरीश पेंगनची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. हरीशचे यकृत प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अभिनेत्याची बहीण हिनेही यकृत दान करण्यास होकार दिला होता. मात्र यकृत प्रत्यारोपणासाठी ३० लाख रुपयांची गरज होती. यासाठी हरीशची बहीण आणि मित्रांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. पण त्याची प्रकृती सतत खालावत गेली. त्यानंतर ३० मे रोजी दुपारी ३.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर पसरली शोककळा
हरीश यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता टोविनो थॉमसने हरीश पेंगनचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, 'रेस्ट इन पीस चेट्टा.'
या सिनेमात केलं कामहरीश पेंगनने 'महेशिनते प्रतिकरम', 'हनी बी 2.5', 'जानेमन', 'जया जया जया हे', 'मिनल मुरली' आणि 'मिनल मुरली' सारखे चित्रपट केले होते. हरीश पेंगन यांच्यावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांनी अभिनेत्याला मदतीची विनंती केली होती.