आलियाच्या यशाने तिची आई सोनी राजदानही खूप खुश आहे. आलियाच्या यशाने आता तिच्या आईनेही पुन्हा दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जवळपास दहावर्षांपूर्वी ‘नजर’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अफेअर’ असे आहे. हा चित्रपट लव्ह स्टोरीवर आधारित असेल. या चित्रपटाची निर्मिती सोनी राजदान आणि आलियाची सावत्र बहीण पूजा भट्ट करीत आहे. पूजाने सांगितले की, ‘हा एक रोमँटिक चित्रपट आहे. सोनी राजदान यांनी अद्भुत कहाणी लिहिली आहे.’ या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये टी सिरीजचाही समावेश आहे. आशिकी-२, जिस्म-२ प्रमाणे याही चित्रपटाचे संगीत लोकप्रिय होईल, असा विश्वास भूषण कुमार यांना आहे.
पुन्हा दिग्दर्शक बनणार सोनी
By admin | Updated: May 30, 2014 09:30 IST