सोनम कपूरच्या आगामी ‘खुबसुरत’ या चित्रपटाचा टीजर ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट ‘वॉट अ गर्ल वाँटस्’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘खुबसुरत’च्या या ट्रेलरमध्ये एक गमतीदार गाणो आहे. ‘इंजन की सीटी में मारो मन डोले.’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्यात सोनम कपूर डान्स करताना दिसते. हे गाणो 9क् च्या दशकातील ‘माँ’ या चित्रपटातील असून मूळ गाण्यात कादर खान साहीला चंद्रासाठी हे गाणो म्हणतात. ‘खुबसुरत’मध्ये त्यांची जागा सोनमने घेतली आहे. चित्रपटाच्या टीमनुसार या गाण्याचे अधिकार विकत घेण्यात आले आहेत; पण चित्रपटाची स्टोरीलाईन वेगळी असणार आहे.