दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोघी एकमेकींच्या किती मोठ्या प्रतिस्पर्धी आहेत, हे तुम्हाला सांगायला नकोच. यांच्यातील ‘कॅट फाईट’ आपण अनेकदा पाहिली. पण असे असले तरी सध्या दीपिका सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूर याच्या डेब्यू सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतेय. ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे हर्षवर्धन बॉलिवूड डेब्यू करतो आहे. आमिर खानपासून तर प्रियांका चोप्रापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचा यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा मिळतो आहे. आता यात दीपिकाचे नावही सामील झाले आहे. दीपिकाने हर्षवर्धनला प्रोत्साहन देणारे व त्याचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. तुझ्या चित्रपटाची मी आतुरतेने प्रतीक्षा करते आहे, हेही दीपिकाने सांगितले आहे. हर्षवर्धननेही दीपिकाला उत्तर देत, मी तुला चित्रपट दाखवायला तितकाच आतूर असल्याचे म्हटलेयं.
सोनमच्या भावाचे दीपिका करतेय प्रमोशन
By admin | Updated: September 30, 2016 03:14 IST