ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 22 -बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच सोनमने बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत एक व्हिडीओ शेअर केला. आनंद आणि सोनम लवकरच लग्न करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. मात्र ती केवळ अफवा असल्याचं स्पष्टिकरण सोनमने यापुर्वी दिलं आहे. येत्या काळात अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बनणा-या चित्रपटात सोनम कपूर संजय दत्तच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसू शकते. या व्हिडीओमध्ये सोनम एका चमचासोबत खेळताना दिसत आहे.
बॉयफ्रेंडसोबत सोनम कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By admin | Updated: February 22, 2017 21:54 IST