स लमान खान नेहमीच सोबतच्या अभिनेत्रींना वजन कमी करण्यासाठी मदत करीत असतो. जरीन खान, सोनाक्षी सिन्हा आदींनी याचा अनुभव घेतला आहे. स्वत: फिट असल्याने सोबतची हिरोईन फिट दिसावी, अशी त्याची इच्छा असते. ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटात सोनम कपूर त्याच्यासोबत आहे. यासाठी सलमान तिला फिटनेसच्या टिप्स देत असल्याचे कळते.