Join us

‘डॉली की डोली’साठी सोनाक्षीचाही विचार

By admin | Updated: December 23, 2014 23:28 IST

दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानने म्हटले आहे की, ‘डॉली की डोली’साठी सोनम कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याआधी सोनाक्षी सिन्हाचाही विचार करण्यात आला

दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानने म्हटले आहे की, ‘डॉली की डोली’साठी सोनम कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याआधी सोनाक्षी सिन्हाचाही विचार करण्यात आला होता; तिच्याकडे वेळ नव्हता. अरबाज म्हणाला, आम्ही अनेक नावांवर विचार केला होता; पण कोणत्या अभिनेत्रीकडे वेळ आहे, तेही पाहावे लागणार होते. स्क्रिप्टिंगच्या वेळी सोनमच्या नावाचाही विचार केला होता. अरबाज खानची निर्मिती असलेले ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ मधील आयटम साँग खूपच हिट ठरले. अरबाजच्या मते सध्या अशा प्रकारची गाणी चलनात आहेत; पण आयटम साँग चित्रपटाच्या विषयानुसार निवडत असल्याचेही त्याने सांगितले.