Join us  

सोनाक्षी सिन्हापासून ते पूजा हेगडेपर्यंत अभिनेत्रींचा असणार ‘प्राऊड फादर्स फॉर डॉटर्स’ उपक्रमात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 3:22 PM

‘प्राऊड फादर्स फॉर डॉटर्स’ हा वडील व मुलगी यांच्यातील भावूक क्षणांचे सादरीकरण छायाचित्रणाच्या माध्यमातून झाल्यामुळे मुलींकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टीकोन बदलून टाकण्यास मदत होईल. मुलगा आणि वडील या नात्याइतकेच घट्ट नाते मुलगी आणि वडील यांच्या नात्यातही असते हा संदेश आपल्यासारख्या पितृप्रधान समाजात पसरविण्यास या कार्यक्रमामुळे मदत होणार आहे.

वर्षातील ती विशिष्ट वेळ आता येऊन ठेपली आहे. यंदाच्या ‘प्राऊड फादर्स फॉर डॉटर्स’ या कार्यक्रमात सहभागी होण्याकरीता अतुल कसबेकर, कोल्स्टन ज्युलिअन, जयदीप ओबेरॉय, प्रसाद नाईक, रोहन श्रेष्ठ, तरुण खिवल आणि अविनाश गोवारीकर उपस्थित राहणार आहेत. ‘नन्ही कली’ या उपक्रमातर्फे दरवर्षी सादर होणार्‍या या ‘प्राऊड फादर्स फॉर डॉटर्स’ कार्यक्रमाचे यंदाचे हे पाचवे पर्व आहे. या कार्यक्रमात हे मान्यवर छायाचित्रकार वडिल आणि मुलगी यांच्यातील भावबंध टिपणार आहेत. 

 

महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र आणि अतुल कसबेकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, ‘प्राऊड फादर्स फॉर डॉटर्स’ हा वडील व मुलगी यांच्यातील भावूक क्षणांचे सादरीकरण छायाचित्रणाच्या माध्यमातून झाल्यामुळे मुलींकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टीकोन बदलून टाकण्यास मदत होईल. मुलगा आणि वडील या नात्याइतकेच घट्ट नाते मुलगी आणि वडील यांच्या नात्यातही असते हा संदेश आपल्यासारख्या पितृप्रधान समाजात पसरविण्यास या कार्यक्रमामुळे मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा कार्यक्रमात अनिल कपूर-सोनम कपूर, ऋषी कपूर-रिधिमा कपूर, जावेद अख्तर-झोया अख्तर, सचिन तेंडूलकर-सारा तेंडूलकर,  सयामी खेर-अद्वैत खेर, पूजा हेगडे-मंजुनाथ हेगडे हे सहभागी झाले होते.

 

या निधी उभारण्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक पित्याला व मुलीला चांगल्या कारणासाठी काही मदत केल्याचे समाधान लाभणार आहे. त्याचबरोबर देशातील काही नामवंत व तज्ज्ञ छायाचित्रकारांकडून आपली छबी काढून घेण्याची संधीही मिळणार आहे. यासाठी इच्छूक बापलेकींनी ऑनलाईन स्वरुपात नावनोंदणी करून वांंद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये 6 वा 7 ऑक्टोबर 2018 या दोन दिवसांत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत उपस्थित राहायचे आहे. 

या कार्यक्रमात सहभागी झालेले नामवंत छायाचित्रकार त्यांचे स्वतःचे शुल्क काहीही घेणार नसले तरी छायाचित्रणासाठी म्हणून काही नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. या शुल्कातून गोळा होणारी रक्कम नन्ही कली या प्रकल्पातील वंचित मुलींच्या विकासाकरीता वापरली जाणार आहे. आतापर्यंत गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांत गोळा झालेल्या निधीमुळे 1200 मुलींना शिक्षणासाठी मदत झालेली आहे. या वर्षीदेखील हेच उद्दीष्ट आहे. नागरिकांनी या अनोख्या व अविस्मरणीय अशा कार्यक्रमात सहभागी व्हावे व #हायफाईव्हफॉरएज्युकेशन  व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :नन्ही कलीपूजा हेगडेसोनाक्षी सिन्हा