Join us

आत्तापर्यंत 'कबाली'चा ६६० कोटींचा गल्ला

By admin | Updated: August 4, 2016 18:19 IST

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कबाली' या चित्रपटाने आत्तापर्यंत छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ६६० कोटींचा गल्ला जमवलाय.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०४ - सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कबाली' या चित्रपटाने आत्तापर्यंत छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ६६० कोटींचा गल्ला जमवलाय.
 बॉक्स ऑफिसवर 'कबाली' चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक केला होता. पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई करत इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. दरम्यान, आजच्या चौदाव्या दिवशी जगभरात तब्बल ६६० कोटींच्या वर गल्ला जमवला आहे. 
तब्बल १२ हजार स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. रिलीजपूर्वीच 'कबाली'चे वीकेंडपर्यंतचे सर्व शोज हाऊसफुल्ल होते. तसेच, या चित्रपटाचे युट्युबवर अपलोड करण्यात आला होता. यावेळी सुद्धा चित्रपटाच्या टीझरला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाले होते.