निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट कधीही नवे कलाकार किंवा नव्या प्रतिभांमध्ये गुंतवणूक करायला घाबरत नाहीत; पण जेव्हा त्यांच्या स्वत:च्या मुलीचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र ते त्यात जराही रस घेत नाहीत. भट्ट यांच्या मते आलिया आता स्टार आहे. जेव्हा त्यांना आलियासोबत काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी नाही, असे उत्तर दिले. ते म्हणतात की, ती तिच्या जगात एक स्टार आहे आणि मी स्टार्ससोबत कधीही काम करीत नाही. ती लकी आहे, जे तिला हवे असते, ते तिला मिळते.’