Join us

सिंघमचा हॉलीवूडला धसका

By admin | Updated: August 18, 2014 22:58 IST

अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्‍स या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांत 5क् कोटींहून जास्त कमाई केली आहे. सध्या या चित्रपटामुळे हॉलीवूडचे धाबेही दणाणले आहेत.

अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्‍स या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांत 5क् कोटींहून जास्त कमाई केली आहे. सध्या या चित्रपटामुळे हॉलीवूडचे धाबेही दणाणले आहेत. त्यामुळे द एक्सपांडेबल्स 3 सारख्या चित्रपटाची रिलीज डेट एक आठवडा पुढे सरकवण्यात आली आहे. हॉलीवूड स्टार सिल्वेस्टर स्टॅलॉनची मुख्य भूमिका असलेला द एक्सपांडेबल्स 3 हा चित्रपट 9 कोटी डॉलर्स खचरून बनवण्यात आला आहे. जगभरात हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज झाला आहे; पण भारतात मात्र तो आठवडाभरानंतर रिलीज होईल. द एक्सपांडेबल्स 3 आणि सिंघम रिटर्न्‍सचा मुकाबला टाळण्यासाठी भारतातील या चित्रपटाच्या वितरकांनी हॉलीवूड चित्रपट 22 ऑगस्टला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.