Join us

मल्लिकासमोर सिद्धूची वळली बोेबडी

By admin | Updated: December 22, 2014 00:07 IST

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही लवकरच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूसोबत ‘कॉमेडी नाईट विद कपिल’ या शोमध्ये दिसणार आहे.

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही लवकरच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूसोबत ‘कॉमेडी नाईट विद कपिल’ या शोमध्ये दिसणार आहे. मल्लिका आणि सिद्धू सहभागी होणाऱ्या भागाचे शूटिंग नुकतेच पार पाडले. त्यावेळी मल्लिकासमोर सिद्धूची अक्षरश: बोबडीच वळली. सिद्धू सेटवर पोहोचला तेव्हा मल्लिकाने त्याला ‘माझ्या डोळ्यात पाहून शायरी कर’ अशी आॅफर दिली. एरव्ही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर भल्याभल्याची भंबेरी उडविणाऱ्या सिद्धूची मल्लिकाने दिलेल्या आव्हानानंतर दांडीच उडाली. त्याला सिद्धूला काही क्षण काहीच सुचले नाही. अखेर त्याने शायरी म्हटलीच; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मल्लिकाने सिद्धूला अडचणीत आणण्याची संधी दवडली नाही.