२००३ साली बॉईज चित्रपटापासून कारकीर्द सुरू करणाऱ्या अभिनेता सिद्धार्थने पंचवीस चित्रपट पूर्ण करून भारतीय सिनेसृष्टीत सिल्व्हर ज्युबिली साजरी केली आहे. या बारा वर्षांच्या कालावधीत सिद्धार्थने तमिळ, तेलुगू, हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचा एन्नाकुल ओरुवन हा पंचविसावा चित्रपट ६ तारखेस प्रदर्शित होत आहे. सिल्व्हर ज्युबिली पूर्ण झाल्याबद्दल त्याने सिनेसृष्टीला टिष्ट्वटरवरून धन्यवाद दिले आहेत. रंग दे बसंती, बोम्मरिलल्लू, अंगंगा ओ धिरेंद्रू असे काही सिद्धार्थचे गाजलेले चित्रपट आहेत.