Join us

सिद्धार्थला कँडीक्रशचे वेड

By admin | Updated: March 20, 2015 23:23 IST

क्लासमेट्स’मधील अनीच्या भूमिकेने चाहत्यांच्या स्पेशली तरुण मुलींच्या काळजाचा ठाव घेणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या वेगळ्याच गोष्टीत बिझी आहे.

‘क्लासमेट्स’मधील अनीच्या भूमिकेने चाहत्यांच्या स्पेशली तरुण मुलींच्या काळजाचा ठाव घेणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या वेगळ्याच गोष्टीत बिझी आहे. आगामी ‘आॅनलाइन-बिनलाइन’च्या सेटवर सारे युनिट जेव्हा सेटवर मोकळ्या वेळेत मजामस्ती करण्यात मग्न असते तेव्हा सिद्धार्थ चांदेकर मात्र कँडीक्रशच्या खेळात स्वत:ला गुंतवून ठेवतो. सिद्धार्थच्या मोबाइल व्यसनाकडे पाहून असे वाटते की, तो आपल्या आगामी चित्रपट ‘आॅनलाइन बिनलाइन’मधील सोशल मीडिया व्यसनाधीन असलेल्या मुलाच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देईल. त्याने त्याच्या करिअरमध्येच प्रगती केली नाही, तर त्याच्या आवडीचा मोबाइल गेम कँडीक्रशमध्येही ३०० लेव्हल पार करून यश मिळवले आहे.