Join us

सिद्धार्थ-कॅटरिना लावणार पडद्यावर आग

By admin | Updated: December 1, 2014 00:30 IST

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे बॉलीवूडमधील हॉट हीरो आणि हिरोईन म्हणून ओळखले जातात.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ हे बॉलीवूडमधील हॉट हीरो आणि हिरोईन म्हणून ओळखले जातात. या हॉट जोडीला पडद्यावर रोमान्स करताना पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. ‘रॉक आॅन’ फेम रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे ‘एक्सेल इंटरटेनमेन्ट’ या आपल्या बॅनरखाली एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘क्लासिक लव्हस्टोरी’ प्रकारातील या चित्रपटासाठी सिद्धार्थ आणि कॅटरिना यांना करारबद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नित्या मेहरावर सोपविण्यात आली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होण्याची चिन्हे आहेत. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटापासून करिअरला सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट हिट झाले आहेत. कॅटरिनासोबत काम करण्याचा मनोदय त्याने वेळोवेळी बोलून दाखविला होता. आता तो पूर्ण होणार आहे.