Join us  

यशच्या 'टॉक्सिक'मध्ये अभिनेत्री श्रुती हासन आणि आंतरराष्ट्रीय संगीतकार जेरेमी स्टॅकची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 3:15 PM

यशचा आगामी सिनेमा 'टॉक्सिक - अ फेरी टेल फॉर ग्रोन अप'ची नुकतीच घोषणा झाली आहे.

KGF आणि KGF 2 चित्रपटातून जगभरात खळबळ माजवणारा अभिनेता यश (Yash) त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यशचा आगामी सिनेमा 'टॉक्सिक - अ फेरी टेल फॉर ग्रोन अप'ची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटाची घोषणा करताना निर्मात्यांनी एक जबरदस्त टीझर व्हिडिओ रिलीज केला होता. ज्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये महिलांचा आवाज होता. या आवाजाने चित्रपट रसिकांची मने जिंकली. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार,  श्रुती हासननेही यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एंट्री केली आहे. 'टॉक्सिक'च्या टीझर व्हिडिओमध्ये अभिनेत्री श्रुती हासनचा आवाज आहे.

लंडन-आधारित, पुरस्कार विजेते संगीतकार जेरेमी स्टॅक यांनी संगीतबद्ध केलेले गाणं जगभरातील प्रेक्षकांशी जोडले गेले आहे.  हे गाणं श्रुती हासनने लिहिले आणि गायले आहे. तिच्या अभिनय कौशल्यासाठी तसेच तिच्या प्रतिभावान आवाजासाठी ओळखली जाणारी, श्रुती हासनने तिच्या मधुर आवाजाने व्हिडिओमध्ये अक्षरशः जीव ओतला आहे.

टॉक्सिकचे दिग्दर्शन मूथॉन फेम गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि ते केव्हीएन प्रॉडक्शनने निर्मिती केले आहे. टॉक्सिक १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे प्रोफाईल डिस्प्ले पिक्चर बदलून 'लोडिंग' केले होते.  

टॅग्स :यशश्रुती हसन