Join us

'हसीना - द क्विन ऑफ मुंबई' मधील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक

By admin | Updated: February 7, 2017 17:09 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटातील एका पोस्टरची झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या चित्रपटातील पहिले पोस्टर तिच्या ट्विटर अकाउंन्टवर अपलोड केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटातील एका पोस्टरची झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या चित्रपटातील पहिले पोस्टर तिच्या ट्विटर अकाउंन्टवर अपलोड केले आहे. 
'हसीना - द क्विन ऑफ मुंबई'  या चित्रपटातील तिचे हे पोस्टर असून या चित्रपटासाठी तिने लूक सुद्धा बदलल्याचे दिसून येते. 'हसीना - द क्विन ऑफ मुंबई'  हा एक बायोपिक चित्रपट आहे. परंतू, या चित्रपटात श्रद्धा कपूर हसीनाची भूमिका निभावणार आहे. हसीना ती कोण आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे.
दरम्यान, या चित्रपटात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे.  तसेच, नाहिद खानची निर्मिती असलेला 'हसीना - द क्विन ऑफ मुंबई' हा चित्रपट अपूर्व लखिया दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट 14 जुलै 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे.