संडे स्पेशल, अनुज अलंकार‘सैराट’ला मिळालेल्या यशाने मराठी चित्रपट जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला झालेल्या उत्पन्नाचे आकडे पाहता एखाद्या मराठी चित्रपटाला मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न मानले जात आहे. या महायशाबद्दल सर्वप्रथम ‘सैराट’च्या पूर्ण टीमला शुभेच्छा. भारतीय चित्रपटाचा जन्म महाराष्ट्रातच झाला होता. त्यातच आता या मराठी चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आशा वाढली आहे. त्यामुळे अन्य चित्रपट निर्मात्यांनाही प्रोत्साहन मिळेल.‘सैराट’चे यश सोशल मीडियावर प्रभाव टाकून गेले आहे. सोशल मीडियामुळे या चित्रपटाची चर्चा गैरमराठी क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचली. एकीकडे महाराष्ट्रात या चित्रपटाने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाला अन्य भारतीय भाषांत डब करावे किंवा त्याचा रिमेक करावा, अशी चर्चा सुरू आहे. हिंदी भाषेशिवाय दक्षिण भारतीय भाषांतही त्याचा रिमेक बनविण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी अधिकार खरेदी करण्याबाबत विचार सुरू आहे.दुसरीकडे हाच चित्रपट अन्य प्रादेशिक भाषांत डब करून रिलीज करण्याचाही विचार सुरू आहे. एकूणच दिल्लीसह उत्तर भारतात हा चित्रपट पाहण्यासाठी सोशल मीडियाने उत्सुकता वाढविली आहे.
‘सैराट’ला दुसऱ्या भाषांतही दाखवा
By admin | Updated: May 15, 2016 03:59 IST