Join us

‘शुभमंगल सावधान’ ची शूटिंग संपली!!

By admin | Updated: April 30, 2017 03:29 IST

अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आयुष्यमानने अलीकडेच ट्विट करताना म्हटले

अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आयुष्यमानने अलीकडेच ट्विट करताना म्हटले, ‘शूटिंगचा अनुभव खूपच मजेशीर असा होता.’ त्याने लिहिले की, ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग पूर्ण झाली आहे. भूमी पेडणेकर, आर. एस. प्रसन्ना आणि आनंद एल. राय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.’ आयुष्यमानच्या ट्विटनंतर लगेचच भूमीने देखील म्हटले की, ‘या चित्रपटाचा अनुभव खूपच चांगला होता. आम्ही ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग पूर्ण केली आहे. धन्यवाद आयुष्यमान, आर. एस. प्रसन्ना! दुसऱ्यांदा आयुष्यमान आणि भूमी एकत्र काम करीत आहेत. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात काम केले होते. ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटात आयुष्यमान आणि भूमी एक विवाहित दाम्पत्य म्हणून बघावयास मिळणार आहेत. भूमी या चित्रपटाबरोबरच अक्षयकुमार स्टारर ‘शौचालय एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर आयुष्यमान परिणितीबरोबर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात काम करीत आहे. आनंद ए. राय निर्मित हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.