Join us  

मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची ‘कसौटी जिंदगी के 2’ची प्रेरणा उर्फ एरिका फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:41 PM

एरिकाचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती.

ठळक मुद्देकुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.

कसौटी जिंदगी के 2’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिसच्या ताज्या फोटोशूटचे फोटो तुम्ही पाहिलेच. पण आज आम्ही प्रेरणाचे अर्थात एरिकाचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. एरिकाचे हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती. या काळात तिने अनेक फोटोशूट केले होते. 2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.

शाळेच्या दिवसापासूनच आयुष्यात काही वेगळे करण्याचे एरिकाचे स्वप्न होते.

एरिका मुंबईत लहानाची मोठी झाली. फेमिना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10 मध्ये आल्यावर एरिकाचा आत्मविश्वास दुणावला.

मॉडेलिंगच्या दुनियेत तर तिने धुमाकूळ घातला. काहीच दिवसांत टॉप सुपरमॉडेलच्या यादीत तिचे नाव झळकू लागले.

एरिकाने साऊथच्या अनेक चित्रपटांतही काम केले. यादरम्यान ती छोट्या पडद्याकडे वळली.

‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.

सध्या ती ‘कसौटी जिंदगी के 2’मालिकेत लीड रोलमध्ये आहे.  

टॅग्स :एरिका फर्नांडिसकसौटी जिंदगी की 2