Join us  

दिवाळीत शिव ठाकरे आईला देणार 'हे' खास गिफ्ट; म्हणाला - 'जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:08 PM

रिअ‍ॅलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिव ठाकरेवर त्याच्या वागणुकीमुळे कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो.

सध्या देशभरात सगळीकडे दिवाळीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.  अशात तुमचे लाडके कलाकार दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. सर्वांचा लाडका अभिनेता शिव ठाकरेदेखील धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्या आईसाठी काही दागिने खरेदी करणार आहे. 

शिव ठाकरेने दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘जेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नसायचे, तेव्हा आम्ही लक्ष्मी आणि गणपतीची छाप असलेली चांदीची नाणी खरेदी करायचो. ती नाणी अजूनही खरेदी करतो, पण आता त्यांच्यासोबत काही सोने आणि इतर वस्तूही खरेदी करतो. आमच्या शिक्षणासाठी आईचे दागिने खूप पूर्वीच विकले गेले होते. आता देवाने आम्हाला थोडे दिले आहे, मला ते दागिने पुन्हा आईला घेऊन द्यायचे आहेत'.

पुढे तो म्हणाला, 'मला सण खूप आवडतात. आमचे घर लाईटिंगने  सजले आहे. इतकी लाईटिंग पाहिल्यावर वीज बील जास्त येईल, असे आईने म्हटलं. पण, मी तिला आई देव देतोय असे म्हणालो. शिवाय, या दिवाळीत मी घरी जाऊन सण साजरा करणार आहे'.

 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अत्यंत मेहनतीने शिव ठाकरे हा यशाच्या शिखरावर पोहचला आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिववर त्याच्या वागणुकीमुळे कौतुकाचा वर्षाव होत असतो.  'बिग बॉस सीझन 16', 'खतरों के खिलाडी सीझन 13' आणि आता 'झलक दिखला जा सीझन 11' मधून शिव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.

टॅग्स :शीव ठाकरेमराठी अभिनेतासेलिब्रिटीदिवाळी 2023