Join us

शिल्पाला वाटतो सैफ सर्वात स्टायलिश

By admin | Updated: September 2, 2015 00:21 IST

शि ल्पा शेट्टी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लग्न आणि आता मुलगा यांमुळे ग्लॅमरस शिल्पा नवीन सिनेमे करण्याचे टाळते.

शि ल्पा शेट्टी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लग्न आणि आता मुलगा यांमुळे ग्लॅमरस शिल्पा नवीन सिनेमे करण्याचे टाळते. मात्र विविध कार्यक्रमांत तिचा सहभाग नेहमीच असतो. डिझायनर दिव्या रेड्डीच्या फॅशन शोमध्ये तिच्या उपस्थितीमुळे चार चांद लागले. या वेळी तिला विचारले की, बॉलीवूडच्या नवीन हीरोंमध्ये सर्वांत स्टायलिश अ‍ॅक्टर कोण आहे तर ती म्हणाली की, नवीनच काय तर जुन्या अ‍ॅक्टर्समध्ये बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खान सर्वात स्टायलिश आहे. सैफ स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला फार छान कॅरी करतो.