Join us  

एखाद्या अभिनेत्री इतकी सुंदर दिसते शर्मन जोशीची पत्नी, आहे एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 2:26 PM

शर्मनला अनेकवेळा पत्नी आणि सासऱ्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात पाहाण्यात येते.

ठळक मुद्देशर्मनची पत्नी ही प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे. शर्मनला पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळते.

अभिनेता शर्मन जोशीने 'रंग दे बसंती', 'स्टाईल', 'मेट्रो', 'थ्री इडियटस', 'गोलमाल', 'फेरारी की सवारी' अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कॉमिक टायमिंगवर तर त्याचे चाहते फिदा आहेत. त्याची पूजा आणि पवन ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. शर्मनच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. शर्मनची पत्नी ही एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी असून शर्मनसोबत तिला अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाहाण्यात येते. 

शर्मनची पत्नी ही प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे. प्रेम चोप्रा यांच्या पत्नीचे नाव उमा असून त्या राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या लहान बहीण आहेत. प्रेम आणि उमा यांना प्रेरणा, पुनिता, आणि रतिका नंदा अशा तीन मुली आहेत. रतिका ही लेखिका असून प्रेम नाम है मेरा हे त्यांच्या आयुष्यावर तिने पुस्तक लिहिले होते.

प्रेम चोप्रा यांची मुलगी पुनिताने अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केले असून विकास हा प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक देखील आहे तर प्रेम चोप्रा यांची मुलगी रतिका ही पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा यांची पत्नी आहे तर प्रेरणा या त्यांच्या मुलीने प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशीसोबत लग्न केले आहे.

शर्मनला पत्नी प्रेरणा आणि प्रेम चोप्रा यांच्यासोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळते. प्रेरणा आणि शर्मन यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. काहीच दिवसांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरं तर लग्नाच्या आधी कित्येक महिने ते दोघे नात्यात होते. पण त्या दोघांमध्ये कोणीच कोणाला प्रपोज केले नव्हते असे शर्मनने एका मुलाखतीत सांगितले होते. 15 जून 2000 ला त्या दोघांचे मुंबईत धुमधडाक्यात लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत.

टॅग्स :शरमन जोशीप्रेम चोपडा