Join us  

शाहरुखच्या बंगल्यात जेंव्हा भूत अवतरते

By admin | Published: March 21, 2017 10:16 PM

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्यामध्ये भूत दिसले. त्या भूताशी शाहरुख खानने गप्पाही मारल्या. मात्र

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्यामध्ये भूत दिसले. त्या भूताशी शाहरुख खानने गप्पाही मारल्या. मात्र, हे भूत खरेखुरे नाही. अनुष्का शर्माचा फिलौरी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नवनविन प्रयोग करत आहे. या चित्रपटात ती एका भूताचा रोल करत आहे. त्यामुळे ती आजकल प्रत्येक ठीकाणी भूताच्या गोष्टी बोलत असल्याचे दिसून येते. अनुष्का शर्माने फेसबुकवर शाहरुख खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये शाहरुख आपल्या घरात आहे, आणि तो भूताशी बोलतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरूख म्हणतोय की, हाय एव्हरीबडी, हा व्हिडीओ मी याकरिता शूट करीत आहे की, लोक खूपच अंधविश्वासी असतात. खिडकीतून जर कुठला आवाज आला किंवा एखाद्या वाद्याचा आवाज आला की, लगेचच भूत आलं असे म्हणतात; परंतु वास्तवात असे नसते. शाहरूखचे हे बोलणे संपताच एका मुलीचा आवाज येतो, सुनीये असे म्हणताच शाहरूखची अशी काही त्रेधातिरपीट उडते की, तो थेट त्याच्या रूममधील सोफ्यावर जाऊन बसतो. अन् आपल्या शैलीत म्हणतो को..को...कौन तेवढ्यात ती मुलगी म्हणतेय, मी भूत आहे... फ्रेंडली भूत. शाहरूख म्हणतो, तू घरात कशी आली अन् तू मला दिसत का नाहीस, त्यावर भूत म्हणतंय, मी भूत आहे, घरात कशी पण येऊ शकते अन् मी तुमच्या शेजारीच बसलेली आहे. भुताटकीचे हे शब्द ऐकून शाहरूखची बोलती बंद होते. तो तिला म्हणतो तुला काय हवे आहे? त्यावर भुताटकी म्हणते मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला तुम्हाला जवळून बघायचे होते. खरं सांगायचं तर जवळून तुम्ही खूपच सुंदर दिसता. भुताटकीचे हे शब्द ऐकल्यानंतर शाहरूख जरा खुलून जातो. तो तिला म्हणतो तू खूपच फ्लर्ट करणारी आहेस. मला तुला काही कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या आहेत. काय, मी तुला बघू शकतो? त्यावर भुताटकी म्हणते हो बघू शकता ना. मी येत्या २४ मार्च रोजी थिएटरमध्ये येणार आहे. तुम्ही मला फिलौरीमध्ये बघू शकाल. शाहरूख हे ऐकू न चक्क उत्साहाच्या भरात भुताटकीला किस करतो.