Join us  

४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 3:44 PM

पठाणमध्ये टायगरचा कॅमिओ तर बघितला आता प्रतिक्षा आहे ती टायगरमध्ये पठाणचा कॅमिओ बघण्याची.

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर आता उत्सुकता आहे ती भाईजान (Salman Khan) सलमान खानच्या 'टायगर ३'ची (Tiger 3). सलमान शाहरुख या जोडीला पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. पठाणमध्ये टायगरचा कॅमिओ तर बघितला आता प्रतिक्षा आहे ती टायगरमध्ये पठाणचा कॅमिओ बघण्याची. चाहत्यांची अपेक्षा पाहून सिनेमाचे मेकर्सही चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत.

45 दिवस होणार शूटिंग

'टायगर ३' यशराज बॅनर्सच्या टायगर या फ्रँचायझीची तिसरी फिल्म असणार आहे. सिनेमात सलमान शाहरुखचा अॅक्शन सीन ७ दिवसात शूट होईल असं आधी ठरलं होतं. मात्र आता नवीन आलेल्या माहितीनुसार हा अॅक्शन सीन ४५ दिवस शूट होणार आहे. तसेच यासाठी भव्य सेट उभारण्यात येतोय.

माध्यम रिपोर्टनुसार, सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा सोबत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि मनीष शर्मा या सरप्राईज एलिमेंटला आणखी खास बनवण्यासाठी मेहनत करत आहेत. ४५ दिवस शूट होणाऱ्या सीक्वेन्ससाठी सर्वच आता आतुर आहेत.

पठाणमध्ये शाहरुखची मदत करण्यासाठी सलमान खानची एंट्री होते तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज होता. थिएटर हाऊसफुल झाले. आता टायगर ३ मध्ये  सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी टायगर आणि झोयाच्या रुपात पुन्हा बघायला मिळणार आहे तर इम्रान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. यावर्षी १० नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :आदित्य चोप्रा टायगर जिंदा हैसलमान खानशाहरुख खानपठाण सिनेमा