शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या आगामी चित्रपटातील एक गाणे रिलीजनंतर लगेचच हिट झाले आहे. ‘मनवा लागे...’ असे बोल असलेले हे गाणे ९ सप्टेंबरला रिलीज करण्यात आले, तेव्हापासून या गाण्याचा व्हिडिओ २६ लाख ७७ हजार ४३ लोकांनी पाहिला आहे. गाण्यात दीपिकाने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यात चित्रपटातील सर्वच कलाकार दिसत असून मुख्यत: शाहरुख आणि दीपिकावर चित्रित करण्यात आलेले हे रोमँटिक गाणे आहे. गाण्याला अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांचा आवाज आहे. तर विशाल शेखर यांचे संगीत आहे. या संगीतकार जोडीनुसार प्रत्येक गोष्टीत वेगाची आवड असलेल्या या जगात ‘मनवा’ शांती आणि प्रेमाचा श्वास आहे.
शाहरुख-दीपिकाचा ‘मनवा लागे’ हिट
By admin | Updated: September 12, 2014 23:42 IST