‘आँ खे २’ चित्रपटात कोणकोण काम करणार आहे? याविषयी फारच चर्चा आहे. मात्र, यावेळी नवीन जोड्या आणि चेहरे घेतले जातील याविषयी अफवा होत्या. ‘आँखे’ मध्ये अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सुष्मिता सेन, अर्जुन रामपाल आणि परेश रावल हे होते पण आता दुसऱ्या भागात नवीन फ्रेश जोडी शाहिद कपूर आणि कॅटरिना कैफ यांना घेण्यात येईल, हे निश्चित झाले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी देखील त्यांना या चित्रपटात जॉईन करणार आहे असे कळते. अमिताभ बच्चन ही असतीलच. अद्याप चित्रपटाची आॅफीशियल अनाऊं समेंट व्हायची आहे. दिग्दर्शक अनीस बाझमी म्हणाले की,‘ अमिताभशिवाय चित्रपट साकारता येणार नाही. १५ ते २० दिवसात सर्वांना आम्ही सांगणारच आहोत.’
शाहिद-कॅट ‘आँखे 2’ मध्ये?
By admin | Updated: December 12, 2015 01:59 IST